धुळ्यात पॉलिशच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लंपास
धुळे : शहरातील चाळीसगाव रोडवरील जिजाई कॉलनीत सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोघा भामट्यांनी भरदिवसा दोन तोळे सोन्यांचे दागिने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. चाळीसगाव रोड पश्चिम हुडको मागील बाजुस असलेल्या जिजाई कॉलनीतील रहिवासी मी नाक्षी शंकर विभुते यांच्या घरात दोघा अनोळखींनी तांब्याच्या भांड्याला व एका चांदीच्या भांड्याला पॉलिश करून दाखवत विश्वास मिळवला. भामट्यांनी विभुते यांना गळ्यातील सोन्यांची मंगलपोत तसेच कानातले काढा, असे सांगून पॉलिश करण्यासाठी भांडे आणण्यास सांगून त्यात हळद व पाणी टाकले व यात मंगलपोत व कानातले टाकले आहे. थोड्या वेळांनी काढुन घ्या, सांगत भामटे निसटले. काही वेळाने महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

