Sanjay Pandey अडचणी वाढल्या : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीची नोटीस
Former Mumbai Police Commissioner Sanjay Pandey मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना ईडी (ED) म्हणजेच सक्तवसुली संचलनालयातर्फे नोटीस पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अलिकडेच संजय पांडे हे सेवानिवृत्त झाले होते तर वा राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तारूढ होताच ईडीची नोटीस पांडे यांना मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
नंदुरबारमार्गे गुजरातमध्ये चोरट्या मार्गाने जाणारे 30 लाखांचे मद्य पकडले
कारकिर्द ठरली होती वादग्रस्त
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना ईडीने चौकशीसाठी नोटीस पाठविल्याचे वृत्त आहे. संजय पांडे यांची आयुक्तपदाची कारकिर्द ही वादग्रस्त ठरली होती. ठाकरे सरकारच्या मर्जीतले अधिकारी म्हणून त्यांची ख्याती झाली होती. यातून त्यांचे काही निर्णय हे वादाच्या भोवर्यातदेखील आढळले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना ईडीची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही नोटीस मनी लाँड्रींगच्या जुन्या केसच्या संदर्भात देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी याबाबतचे संपूर्ण विवरण अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
