Utran Old Man Suside 73 वयोवृध्दाची गळफास घेत आत्महत्या : उत्राण गावातील घटना


Elderly man commits suicide by strangulation: Incident in Utran village एरंडोल : तालुक्यातील उत्राण येथील 73 वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरात रविवारी सकाळी नऊ वाजेपूर्वी दोरीने गळफास घेतला. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष माधवराव कोळी (73, रा.उत्राण, ता.एरंडोल) असे मयत वयोवृध्दाचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
संतोष कोळी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवार, 3 जुलै रोजी सकाळी 9 वाजेच्या पुर्वी राहत्या घरातील लोखंडी अँगलला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतला. दरम्यान घरचे कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


अमळनेरात सेवानिवृत्त शिक्षकाकडे दिड लाखांची घरफोडी 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !