Serial Killer In Kingaon Custody किनगावातील सिरीयर किलर कोठडीत : दुसर्या खुनाच्या गुन्ह्यात होणार अटक
Serial Killer In Kingaon Custody : Arrested for Second Murder यावल : तीन वयोवृद्ध महिलांच्या खून प्रकरणातील आरोपी बाळू उर्फ मुकुंदा बाबुलाल लोहार (30, किनगाव) याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस कोठडीत आरोपीने खून करून चोरी केलेले दागिने ज्या सराफा व्यावसायिकास विक्री होते ते जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, दुसर्या वृद्ध महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला तपासासाठी ताब्यात द्यावे म्हणून यावल पोलिसांनी अर्ज दिला आहे.
हल्ला केल्याने वृद्धेचा मृत्यू
दागिने हिसकावण्यासाठी 23 मे रोजी किनगाव येथील मराबाई सखाराम कोळी (75) या महिलेवर हल्ला झाला होता. यानंतर उपचार सुरू असताना 31 मे रोजी कोळी यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या गुन्ह्यात बाळू उर्फ मुकुंदा बाबुलाल लोहार (30, रा.किनगाव बुद्रूक) याला 27 जून रोजी ताब्यात घेतले होते. यानंतर 28 जूनपासून ते 4 जुलैपर्यंत दोन टप्प्यात त्याला पोलिस कोठडी मिळाली. सोमवारी त्याची पोलिस कोठडी संपली. यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विनोद गोसावी, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील, सलीम शेख, उल्हास राणे, सुनील जमदाडे यांच्या पथकाने त्यास न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, पोलिस कोठडीत आरोपीने खून करून चोरी केलेले दागिने ज्या सराफा व्यावसायिकास विक्री होते ते जप्त करण्यात आले. आता खुनाच्या दुसर्या गुन्ह्यात चौकशीसाठी ताबा मिळावा म्हणून पोलिसांनी न्यायालयाला अर्ज केला आहे. या प्रकरणाचा तपास यावल येथील पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विनोद गोसावी, सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण, हवालदार जगन्नाथ पाटील, सलीम शेख, उल्हास राणे, सुनील जमदाडे हे करत आहेत.
