Death Of A Young Man Who Came With His Friend सेक्स पॉवरच्या गोळ्या अति सेवनाचा परीणाम : प्रेयसीला लॉजवर घेवून गेलेल्या तरुणाचा मृत्यू


Consequences of Overdose of Sex Power Pills : Death of a Young Man Who Took his Girlfriend to a Lodge नागपूर : सेक्स पॉवर वाढवण्याच्या अति गोळ्या सेवन करून नागपूरात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. नागपूरातील सावनेर या परीसरातील बस स्टॉपच्या मागील केशव लॉजमध्ये रविवारी ही घटना घडली. अजय जंगलूजी परतेकी (27) असे मयत तरुणाचे नाव आहे. सेक्स पॉवरच्या गोळ्या अति प्रमाणात घेतल्याने तरुणाचा रक्तदाब वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. मयत तरुण हा कळमेश्वर ताल्युक्यातील धापेवाडा या गावातील निवासी असून खाजगी वाहनावर चालक आहे तर 21 वर्षीय प्रेयसी नर्स आहे.

प्रेयसीने दिली माहिती
तरुण व तरुणी लॉजमध्ये आल्यानंतर काही वेळेतच प्रेयसीने तरुण बेशुद्ध असल्याची माहिती लॉजच्या मॅनेजरला दिली. त्यानंतर लॉजवरील कर्मचार्‍यांनी तरुणाला उपचारार्थ हलवले मात्र त्यानंतर या तरुणाचा मृत्यू ओढवला. दरम्यान, मयत तरुण अजय जंगलूजी परतेकी याने संभोग करण्यापूर्वी उत्तेजित करणार्‍या पदार्थांचं (वियाग्रा) सेवन केलं होते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या घटनेची माहिती डॉक्टरांकडून पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी पांढुरणा मध्यप्रदेश येथे राहणार्‍या त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेतले आहे.


तीन वर्षांपासून प्रेमसंबंध
अजय याचे त्याच्या प्रेयसीसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेम संबंध होते. येत्या दोन महिन्यात दोघेही लग्न करणार होते. अजयची 21 वर्षीय प्रेयसी नर्स आहे. अजय रविवारी सकाळी पांढुरणा येथे गेला आणि दुपारी तीन वाजता प्रेयसीला सोबत घेऊन सावणेरच्या केशव लॉजमध्ये घेऊन गेला. प्रेयसीसोबत सेक्स करताना त्याने स्टॅमिना वाढवण्यासाठी संभोगासाठी उत्तेजित करणार्‍या गोळ्या घेतल्या होत्या. संभोग करीत असताना तो खाली पडून बेशुद्ध झाला. सावनेर पोलिसांनी प्रियसीचा जबाब नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.

किनगावातील सिरीयर किलर कोठडीत : दुसर्‍या खुनाच्या गुन्ह्यात होणार अटक 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !