जुन्या वादातून पिंप्राळ्यातील तरुणाला मारहाण : पाच संशयीतांविरोधात गुन्हा
Young Man Beaten Up in Pimpri-Chinchwad Over Old Feud : Crime against Five Suspects जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून पिंप्राळा येथील तरूणाला दुचाकीवर बसवून शेतात नेवून पाच जणांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतात नेत केली मारहाण
अजय मनोज अहिरे (19, भवानी मंदीराजवळ, पिंप्राळा) हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 4 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास अजय अहिरे हा दुचाकीने मु.जे. महाविद्यालयाच्या गेटसमोरून जात असतांना गोलू ठाकूर, निशांत चौधरी यांनी त्याची दुचाकी अडविली कारण नसतांना अजयला दुचाकीवरून खाली ओढले. गोलू ठाकूर *रा. तुकाराम वाडी), निशांत चौधरी, प्रेम मिस्तरी, यश शंकपाळे आणि तेजस (सर्व रा. डीएनसी कॉलेज, जळगाव) यांनी चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर सर्वांनी मिळून अजयला दुचाकीवर जबरदस्ती बसवून आसोदा रोडवरील एका शेतात नेवून तेथेही पाचही जणांनी बेदम मारहाण केली. यात अजय हा गंभीर दुखापत झाली.

पाच संशयीतांविरोधात गुन्हा
जखमीवस्थेत अजय अहिरे हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री 11 वाजता संशयित आरोपी गोलू ठाकूर (रा. तुकाराम वाडी), निशांत चौधरी, प्रेम मिस्तरी, यश शंकपाळे आणि तेजस (सर्व रा. डीएनसी कॉलेज, जळगाव) यांच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.