जुगार्‍यांना पकडताना धरणगाव सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोघे कर्मचारी जखमी


शामखेड्या फाट्यानजीक सहा जुगारी गजाआड : एक लाख सहा हजार 405 रुपयांचा मुद्देमाल जखमी

धरणगाव : शामखेडा फाट्याजवळ जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्याने धरणगावचे सहाय्यक निरीक्षक पवन देसले यांच्यासह कर्मचार्‍यांनी रविवारी मध्यरात्री धाड टाकली मात्र पोलिसांना पाहताच जुगारी पळू लागल्याने पोलिसांनीही त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला मात्र या पाठलागात सहाय्क निरीक्षक देसले यांच्यासह कॉन्स्टेबल पंकज पाटील व कैलास पाटील किरकोळ जखमी झाले. या प्रकरणी सहा जुगार्‍यांना अटक करण्यात आली असून घटनास्थळावरील सहा दुचाकी तसेच रोख दोन हजार 405 रुपयांचा एकूण एक लाख सहा हजार 405 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !