इलेक्ट्रीक शॉक लागल्याने अमळनेरच्या युवकाचा मृत्यू
अमळनेर : बांधकामाच्या साईटवर शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 12 वाजता शहरातील ढेकूरोडवरील जिजाऊ नगरात घडली. नंदकिशोर अशोक पाटील (हेडावे) असे मयताचे नाव आहे.
आसारी कापताना लागला शॉक
नंदकिशोर हा युवक जिजाऊ नगरात बांधकाम साईटवर इलेक्ट्रिक मशिनने आसारी कापत होता. त्यात त्याला शॉक लागल्याने तो बेशुद्ध झाला. खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
