gang-rape अल्पवयीन बहिणीचा हत्येचा कट रचत सामूहिक बलात्कार करण्यास सांगितले : या राज्यातील घटना


Conspiracy to murder a minor sister and gang-rape : Incidents in this state नवी दिल्ली : तरुणीनेच आपल्या अल्पवयीन बहिणीच्या हत्येचा कट रचल्याला शिवाय बलात्कार करण्यास सांगितल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे उघडकीस आली. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय तरुणीसह सात जणांना अटक केली.

बहिणीवर राग असल्याने टोकाचे पाऊल
अटक्ेतील तरुणीला आपल्या लहान बहिणीवर राग होता. ही तरुणी चार तरुणांसोबत रीलेशनशिप मध्ये होती, त्यांना भेटण्यापासून लहान बहिणीने रोखल्याचा राग होता व त्यावरून दोघी बहिणींमध्ये वारंवार भांडण होत असे. नुकतेच मोठ्या बहिणीचे चार जणांशी अनैतिक संबंध असल्याची माहिती धाकट्या बहिणीला समजल्यावर तिने त्याला आक्षेप घेतला. तेव्हा मोठ्या बहिणीने खूनाचा कट रचला.






चौघांनी केला सामूहिक अत्याचार
आता ही तरुणी या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आहे. कारण आरोपीच्या चौकशी दरम्यान पोलिसांना कळले की, जेव्हा किशोरीवर बलात्कार झाला तेव्हा तिच्या मोठ्या बहिणीने तिला पळून जाण्यापासून रोखण्यासाठी तिचा हात धरून ठेवला होता. त्यानंतर चार संशयितांनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला आणि तिच्या बहिणीसमोर दुपट्ट्याने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर स्थानिक रहिवाशांना अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. चौकशीत आरोपींनी या घटनेत आपला सहभाग कबूल केला असून घटनेची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले सहा तरुण हे मित्र असून, त्यांनी पीडितेच्या मोठ्या बहिणीसोबत या गुन्ह्याचा कट रचला. सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

जामनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !