भुसावळात पुन्हा घरफोडी : पोलिसांची गस्त ठरतेय नावालाच


भुसावळ : शहरातील रानातला महादेव मंदीर परिसरातील हुडको कॉलनीतील अभिजीत राजेद्र जाधव यांच्या बंद घराचा चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरातील टिव्ही, सोन्या-चांदीचे दागिणे असा सुमारे 25 हजार रूपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी अभिजीत जाधव हे औरंगाबाद येथे लग्नाला गुरूवारी (दि. 21) गेले होते, त्यामुळे त्यांचे घर बंद होते. याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी कोडां तोडून घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिणे, तीन हजार रूपये रोख आणि घरातील मोठा टिव्ही असा सुमारे 25 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. जाधव यांच्या घरातील लाईट आणि दरवाजा उघडा दिसल्याने जाधव यांच्या घराजवळील रहिवासी रामदास बागूल यांनी जाधव यांना मोबाईलवरून तुमच्या घरातील लाईट सुरू असून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. रविवारी जाधव औरंगाबाद येथून आल्यावर त्यांनी बाजरपेठ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सुनील जोशी पुढील तपास करीत आहे. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी चोरीची माहिती जाणून घेतली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !