दिड लाखांसाठी विवाहितेला छळले
Harassed A Married Woman For Rs 1.5 lakh जळगाव : कर्ज फेडण्यासाठी माहेरून दीड लाख रुपये न आणल्याने पतीने विवाहितेचा छळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत जळगाव शहर पोलिस ठाण्यात पती विरोधात शिवाजीनगर हुडको भागातील विवाहितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीविरोधात गुन्हा दाखल
शिवाजी नगर दालमिल परीसरातील माहेर असलेल्या रुबीना बी. शोएब शेख (22) यांचा विवाह शिवाजी नगर हुडको येथील शोएब जावेद शेख यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला होता. लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती शोएब शेख याने पत्नीला माहेरीहून कर्ज फेडण्यासाठी दीड लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेच्या आईची परीस्थिती हालाखीच्या असल्यामुळे पैसे आणले नाही, याचा राग मनात धरून घरातील काम जमत नाही असे सांगून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. याला विरोध केला असता विवाहितेला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या.

शहर पोलिसात गुन्हा
याबाबत मंगळवार, 5 जुलै रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी 6 वाजता शहर पोलीस ठाण्यात पती शोयब जावेद शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक करुणा सागर करीत आहे.