MLA Gulabrao Patil’s आमदार गुलाबराव पाटील यांचा दावा : धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळणार !


MLA Gulabrao Patil’s Claim : We Will Get the Arrow Symbol ! जळगाव :  संख्याबळावर धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हाला मिळेल, असा दावा आमदार गुलाबराव पाटील (MLA Gulabrao Patil) यांनी केला आहे. राज्यात विधान परीषद निवडणूक आटोपल्यापासून सुरू असलेले सत्तांतर नाट्य दोन दिवसापूर्वी संपुष्टात आले. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे गटात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह आ.लता सोनवणे, आ.किशोर पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. तब्बल 13 दिवसानंतर गुलाबराव पाटील जळगावात आले होते. यावेळी त्यांचं कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. प्रसंगी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

गुलाबराव म्हणाले आम्ही उठाव केला
राज्यात शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून दोन दिवसीय अधिवेशनात आमदार गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केल्याने पुन्हा ते चर्चेत आले होते. आम्ही शिवसेन पक्ष वाचवण्यासाठी उठाव केला असून विधानसभेमध्ये शिवसेना गट म्हणून आम्ही बसलो असून आगामी काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.






आमचीच शिवसेना खरी : गुलाबराव पाटील
निवासस्थानी परतल्यानंतर आमदार गुलाबराव पाटील  (MLA Gulabrao Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधला. बंडांची कारण देत आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावाही त्यांनी केला. इतकंच नव्हे तर शिवसेना नेते संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच आमच्यावर बोलावं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. आमदार पाटील म्हणाले, शिवसेनेचे 18 पैकी 12 खासदार आणि 20 माजी आमदार आमच्या सोबत येणार आहेत. काही खासदारांना आपण भेटलो असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

हरवलेल्या मोबाईलच्या दुरुपयोग करीत तरुणाला सव्वातीन लाखांचा गंडा 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !