भरधाव लक्झरी चारचाकीला धडकली : दोघे जखमी
Bhardhaw hit luxury four-wheeler: Two injured एरंडोल : राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने येणार्या लक्झरीने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात लक्झरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
लक्झरी चालकाविरोधात गुन्हा दाखल
धनराज रमेश पाटील (35, सावखेडा, ता.पारोळा) हा तरुण हिरालाल अशोक पाटील यांच्या सोबत अॅक्वा पाणी वाटपाचे काम करतात. मंगळवार, 5 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास दोघे त्यांच्या मालकीचे (एमएची 19 बीएम 5864) चारचाकी वाहनातून पाणी वाटपाचे काम करत असताना राष्ट्रीय महामार्गावरील पंजाब ढाव्यावर भरधाव वेगाने येणारी लक्झरी (एम.एच.19 सी.वाय. 9027) ने जोरदार धडक दिली. या अपघातात धनराज पाटील आणि हिरालाल पाटील हे दोघे जखमी झाले तर वाहनाचे मोठे नुकसान झाले. याबाबत धनराज पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर लक्झरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार विलास पाटील करीत आहे.
