Two-wheeler killed on bus near Nasirabad railway flyover नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ भरधाव बसने उडवल्याने दुचाकीस्वार जागीच ठार


Two-wheeler killed on bus near Nasirabad railway flyover जळगाव : जळगावहून मेहकरकडे भरधाव वेगाने निघालेल्या बसने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात बुधवारी दुपारी अडीच वाजता नशिराबाद रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडला. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रोशन मनोहर कोंगळे (20, झोडगा, ता.मलकापूर, जि.बुलढाणा) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

आमदार गुलाबराव पाटील यांचा दावा : धनुष्यबाणाचे चिन्ह आम्हालाच मिळणार !

बसच्या जबर धडकेने तरुण जागीच ठार
रोशन मनोहर कोंगळे (20, झोडगा, ता.मलकापूर, जि.बुलढाणा) हा तरूण बुधवार, 6 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने भुसावळ कडून जळगावकडे येत असतांना नशिराबाद रेल्वे उड्डाण पुलावर समोरून येणारी जळगावकडून मेहकरकडे भुसावळमार्गे जाणारी भरधाव बस (एम.एच.40 ए.क्यू.6270) ने जोरदार धडक दिली. या अपघातात रोशन कोंगळे हा तरूण जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.






शिवसेनेतील 11 खासदार शिंदे गटात जाणार ? 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !