Election For Nine Municipalities भुसावळसह जिल्ह्यातील नऊ पालिकांसाठी 18 ऑगस्ट रोजी निवडणूक

आचारसंहिता जारी : 19 रोजी लागणार निवडणुकीचा निकाल


Election For Nine Municipalities In The District Including Bhusawal on 18th August जळगाव : पालिका निवडणुकांकडे नजरा लावून असलेल्या राजकीय मातब्बरांना अखेर शुक्रवारच्या बातमीनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने कमी पाऊस असणार्‍या भागातील व राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 ऑगस्ट रोजी मतदान तर 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे शिवाय शुक्रवारपासूनच निवडणुकीसाठीची आचारसंहिता जारी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ या ‘अ’ वर्ग पालिकेसह अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, यावल या एकूण नऊ नगरपालिकांसाठी आता 18 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो अबे यांची गोळ्या झाडून हत्या

अन्य पालिकांसाठी पुढील ब्प्प्यात निवडणूक
शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, पारोळा, फैजपूर, यावल या एकूण नऊ नगरपालिकांसाठी निवडणूक होईल. यातील भुसावळ ही अ वर्गातील, अमळनेर आणि चाळीसगाव या ब वर्गातील तर अन्य क वर्गातील नगरपालिका आहेत तर जिल्ह्यातील अन्य नगरपालिकांचे मतदान पुढील टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


रणधुमाळीस प्रारंभ
या नगरपालिकांसाठी 22 ते 28 जुलै 2022 च्या दरम्यान नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. यानंतर 29 रोजी छाननी होऊन 4 ऑगस्ट पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे आता नऊ ठिकाणी रणधुमाळीस प्रारंभ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अखेर बिगुल वाजला : राज्यातील 92 नगरपालिकांसह चार नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !