Mayor along with Sarpanch will now be elected by the people ब्रेकींग न्यूज : सरपंचांसह नगराध्यक्षांची निवड आता जनतेतून होणार !
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले सूचक संकेत : मुनगंटीवारांचे ट्वीट
Breaking News: Mayor along with Sarpanch will now be elected by the people! मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडणार जाणार याबाबतचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यापूर्वी राबवण्यात आलेल्या प्रयोगानंतर भाजपाला त्यात मोठे यश आल्यानंतर यंदाच्या निवडणुकीतही ही पद्धत्त वापरण्यात येईल, अशी दाट शक्यता आहे. नगराध्यक्ष व सरपंच हे थेट जनतेतून निवडले जावेत, अशी मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केल्याने राजकीय मातब्बरांचे आता पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
अखेर बिगुल वाजला : राज्यातील 92 नगरपालिकांसह चार नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू
मुनगंटीवारांचे सूचक ट्विट
फडणवीस यांची भेट घेऊन आपण नगराध्यक्ष व सरपंच थेट जनतेतून निवडले जावेत, अशी मागणी केली. त्यावर त्यांनी योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असे ट्वीट मुनगंटीवार यांनी केले आहे तसेच अडीच वर्षे नगराध्यक्ष वा सरपंच यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही, अशी तरतूद केली जाण्याचीदेखील शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात निवडणूका जाहीर
राज्यातील 92 नगरपरीषदेसह व चार नगरपंचायतींसाठी 18 ऑगस्ट रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत थेट नगराध्यक्षांची निवडणूक होईल का?, असा प्रश्न राजकीय क्षेत्रातून उपस्थित केला जात आहे मात्र नव्यानेच सत्तेवर आलेल्या शिंदे सरकारला तसे करावयाचे म्हटल्यास अध्यादेश काढावा लागणार आहे. नगरपरीरषदा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी थेट नगराध्यक्ष, थेट सरपंच निवडण्याची पद्धत पुन्हा आणली होती. याचा भाजप व शिवसेनेला मोठा फायदा झाला होता. मात्र उद्धव ठाकरे नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार येताच त्यांनी ती पद्धत बंद केली होती तर भाजपाच्या सहकार्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये पुन्हा थेट जनतेतून नगराध्यक्ष व सरपंच निवडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.