Pachora City Gharphodi पाचोरा शहरातील भाग्यलक्ष्मी नगरात धाडसी घरफोडी


Brave Burglary In Bhagyalakshmi Town of Pachora City पाचोरा : शहरातील पुनगाव रोडवरील भाग्यलक्ष्मी नगर भागातील बंद घर फोडत चोरटयंनी सोनेचांदीच्या दागिन्यांसह सहा हजारांची रोकड मिळून 38 हजारांचा ऐवज लांबवल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

मोठी बातमी : राज्य सरकारकडे सादर झाला इम्पिरीकल डाटा

अज्ञात चोरट्यांविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा
शहरातील पुनगाव रोडवरील भाग्यलक्ष्मीनगर भागात भिकन विठ्ठल पाटील हे वास्तव्यास आहेत. गुरुवार, 7 जुलै ते शनिवार, 9 जुलै दरम्यान भिकन पाटील हे घरी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा सेफ्टी दरवाजाचा कडी कोंडा तोडत घरात प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटातील तिजोरी तोडत त्यात ठेवलेले 32 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व सहा हजार रुपये रोख असा 38 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी भिकन विठ्ठल पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुर्यकांत नाईक हे करीत आहे.


भुसावळात कत्तलीपूर्वीच आठ गुरांची सुटका : दोघांना अटक

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !