भरधाव मालवाहू गाडीने उडवले : चिंचखेड्याच्या दुचाकीस्वार ठार


Freight car blown up : Chinchkheda’s two-wheeler killed जळगाव : भरधाव मालवाहू गाडीने उडवल्याने झालेल्या अपघातात चिंचखेडा, ता.मोताळा येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर मालवाहू गाडीतील तीन जण जखमी झाल. हा अपघात विटनेर गावाजवळ रविवारी दुपारी घडला. साहेबराव चिमा शिंदे (चिंचखेडा, ता.मोताळा) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात चुलत भावानेच केला मतिमंद बहिणीवर अत्याचार : नराधम आरोपीला अटक

भरधाव गाडीने उडवल्याने दुचाकीस्वार ठार
जळगाव तालुक्यातील विटनेर गावापासून चार किलोमीटर अंतरावर नेरीकडून एरंडोलकडे जाणार्‍या महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी (जी.जे.05 बी.टी.6489) ने समोरून येणार्‍या दुचाकी (एम.एच.28 डब्ल्यू.9440) ला जोरदार धडक दिली .हा अपघात रविवार, 10 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला. या अपघातात दुचाकीस्वार साहेबराव चिमा शिंदे (चिंचखेडा, ता.मोताळा, जि.बुलढाणा) हा तरुण जागीच ठार झाला तर गाडीतील चालकासह इतर दोघे जखमी झाले. जखमींना तातडीने रूग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या भीषण अपघातात दुचाकीचा अक्षरश: चेंदामेंदा झाला तर महिंद्रा पिकअप गाडी हा रस्त्याच्या चारीत पडली.


चिंचखेडा येथे शोककळा
अपघात झाल्यानंतर विटनेरचे पोलिस पाटील साहेबराव धुमाळ यांच्यासह नागरीकांना घटनास्थळी धाव घेतली. मयत तरूण हा कामानिमित्त साक्री (धुळे) येथील विजापूर येथे आपल्या नातेवाईकांकडे गेला होता व काम आटोपून पुन्हा दुचाकीने चिंचखेडा, ता.मोताळा येथे आपल्या गावी परतीचा प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. या घटनेने चिंचखेडा येथे शोककळा पसरली आहे.

दहिगावच्या तरुणाची गळफास घेत आत्महत्या




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !