‘Supreme’ consolation to 16 MLAs from Shinde group: No action till ‘he’ शिंदे गटातील 16 आमदारांना ‘सर्वोच्च’ दिलासा : ‘तो’ पर्यंत कारवाई नाहीच


‘Supreme’ consolation to 16 MLAs from Shinde group: No action till ‘he’ मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांपैकी 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावीए अशी याचिका शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकरणावर तातडीने सुनावणी करण्याची विनंती शिवसेनेच्या वतीने न्यायालयाला करण्यात आली मात्र सुप्रीम कोर्टाने तशी सुनावणी घेता येणार नसल्याचे स्पष्ट केल्याने आमदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

सुप्रीम कोर्टात कामकाज
शिवसेनाविरुद्ध एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्यासह 16 आमदारांचं निलंबन, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव यासह अनेक राजकीय गुंतागुंतीच्या जटील प्रश्नांवर महत्त्वपूर्ण सुनावणी दि.11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणार होती. गेल्या वेळी झालेल्या कामकाजानंतर न्यायालयाने दि.11 जुलै तारीख दिलेली होती. दरम्यान, हे प्रकरण कोर्टात लिस्ट न झाल्यानं आज सुनावणी होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. परंतु हे प्रकरण सुप्रीम कोर्टात लिस्ट झाल्यानंतर आजच त्यावर कामकाज झाले.


गिरीश महाजन बालिश ; आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली : आमदार एकनाथराव खडसेंचा जोरदार पलटवार

तो पर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश
सर्वोच्च न्यायालयात झालेल्या कामकाजात शिवसेनेकडून तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली. तत्काळ सुनावणी घेणे शक्य नसून सर्व प्रकरणांच्या कामकाजासाठी खंडपीठ नेमता येईल परंतु त्यासाठी विलंब लागू शकतो. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांवर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्णयाने शिंदे (CM Eknath Shinde) समर्थक आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने एकनाथ शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सर्व याचिकांवर कामकाज होणार असून सर्वोच्च न्यायालयात सर्व ऐकून घेणार असल्याचे समजते.

भुसावळातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार : सावदा रेल्वे स्टेशन प्रबंधकाविरोधात गुन्हा 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !