In Amalner Minor Girl Kidnapping अमळनेर शहरातील अल्पवयीन मुलीचे अज्ञाताकडून अपहरण
Kidnapping of a minor girl from Amalner town by unknown अमळनेर : शहरातील गांधलीपूरा भागातून अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणी अमळनेर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
शिंदे गटातील 16 आमदारांना ‘सर्वोच्च’ दिलासा : ‘तो’ पर्यंत कारवाई नाहीच
अज्ञाताचा पोलिसांकडून शोध
शहरातील गांधलीपूरा भागात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 9 जानेवारी रोजी सकाळी अल्पवयीन मुलीची आई व भाऊ हे कामाला निघून गेले. त्यावेळी अल्पवयीन मुलगी ही घरात एकटीच होती. दुपारी तीन वाजता मुलीचा भाऊ कामावरून घरी आला तेव्हा त्याला त्याची बाहिण दिसली नाही. त्याने मामा व आजी यांच्या घरी जावून तपास केला असता मुलगी आली नसल्याचे सांगितले. त्यानंतर सर्वत्र तिचा शोध घेतला परंतू अल्पवयीन मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवार, 10 जुलै रोजी दुपारी अमळनेर पोलिस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक कैलास पवार करीत आहे.
