तलवारीच्या धाकावर दहशत : आरोपी एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात


Sword Attack : Accused In MIDC Police Trap जळगाव : तालुक्यातील खेडी गावातील माऊली नगरात तलवारीच्या धाकावर दहशत निर्माण करणार्‍या आरोपीस तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश रावसाहेब पाटील (20, खेडी) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव तालुक्यातील खेडी येथील पाटीलवाड्यातील संशयीत निलेश रावसाहेब पाटील हा तरूण हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. सोमवार, 11 जुलै रोजी सकाळी 10 वाजता कारवाई करत संशयीत आरोपी निलेश रावसाहेब पाटील (20) याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीकडून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल छगन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी संशयीत आरोपी निलेश रावसाहेब पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक किशोर पाटील, सुधीर साळवे, मुदस्सर काझी, कॉन्स्टेबल छगन तायडे यांनी कारवाई केली.

भुसावळात छेडखानी करणार्‍या रोडरोमिओंची होणार पोलिसांकडून ‘धुलाई’

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !