चोरट्यांनी 12 हजारांचे भंगार लांबवले
जळगाव : शहरातील श्री गुरुप्रभा पावर प्लॉट कंपनीतून 12 हजार रुपये किंमतीचे भंगार चोरट्यांनी लांबवले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला.
चोरट्यांनी आता भंगारावरही नजर
एमआयडीसीत श्री गुरुप्रभा पॉवर प्लाँट कंपनी असून कंपनीच आवारात भंगार सामान मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. सोमवार, 11 जुलै रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी 12 हजार रुपये किंमतीचे भंगार लांबवलयची बाब समोर आली. हा प्रकार समोर आल्यानंतर कंपनीचे सुपरवायझर विजय श्रीरामधनी यादव (38) यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्नील पाटील हे करीत आहेत.
