नशिराबादजवळ भरधाव अ‍ॅपेच्या धडकेने रुग्णवाहिका उलटली : दोघे जखमी


Ambulance Overturns After Collision With Bhardhav App Near Nashirabad : Two Injured जळगाव : भरधाव अ‍ॅपे रीक्षा विरुद्ध दिशेने आल्यानंतर रुग्णवाहिकेला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहने उलटल्याने डॉक्टरांसह रुग्णवाहिका चालक जखमी झाला. राष्ट्रीय महामार्गावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या समोर गुरुवारी दुपारी चार वाजता हा अपघात घडला. या अपघातात रुग्णवाहिकेतील डॉ.मेहबूब अन्सारी व रुग्णवाहिका चालक निलेश धनजी धनगर (वरणगाव) हे जखमी झाले आहेत. अ‍ॅपे चालकाविरोधात नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अ‍ॅपेच्या धडकेने अपघात
गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका (एमएच 14 सीएल 0755) जळगावकडून वरणगावकडे जात असताना विरूद्ध दिशेने आलेली अ‍ॅपे रीक्षा (एमएच 19 सीडब्ल्यू 0638) ने धडक दिल्याने रूग्णवाहिका आणि रीक्षा दोन्ही उलटल्या तर रीक्षाचा यात अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमधील सहकार्यांनी धाव घेऊन जखमींवर उपचार केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अ‍ॅपे चालकाविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.


भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरील बेवारस बॅगेत बॉम्ब ; अफवांच्या बाजाराने यंत्रणेला फुटला घाम

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !