भुसावळातील शौचालयांच्या दुरूस्तीसाठी मुख्याधिकार्‍यांना निवेदन


भुसावळ : शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील गंगाराम प्लॉट, पंचशील नगर, कोलते गल्ली, गौतम नगर आदी भागांमधील शौचालयाची दुर्दशा झाली असून त्यांची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी,अशी मागणी नगरसेविका मीनाक्षी धांडे व सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

समस्या सोडवण्याची अपेक्षा
या निवेदनाचा आशय असा की, या भागातील शौचालयांमध्ये वॉश बेसिंग, टाईल्स, दरवाजे, पाणी कुंडी, दिवे, रंग, नळ कनेक्शन आदींची दुरुस्ती करावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी पाश्‍चिमात्य (वेस्टर्न) शौचालय तात्काळ लावावे, प्रभागातील संतोषी माता मंदिराजवळ ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करण्यात यावी, प्रभागातील पथदिवे बर्‍याच दिवसांपासून बंद असून त्यामुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून या सर्व समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !