सोशल मिडीयावर तरुणीला अश्लील संदेश पाठवला : एकाविरोधात गुन्हा


Sent Obscene Message to Young Woman On Social Mmedia : Crime against one जळगाव : शहरातील 36 वर्षीय तरूणीला व्हॉटसअ‍ॅपवर अश्लिल मॅसेज पाठवून तिचा विनयभंग करण्यात आला. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

मोठी बातमी : राज्यातील आठ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर

अज्ञाताविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील एका भागात 36 वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ती आपला उदरनिर्वाह करते. 13 जुलै रोजी रात्री जेवण करून झोपली असतांना तिच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने अनोळखी नंबरवरून तिला मॅसेजेस पाठविले. त्यानंतर अश्लिल फोटो व्हॉटसअ‍ॅपवर पाठविले. यासंदर्भात गुरूवार, 14 जुलै रोजी तरूणीने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.


लखाळे हादरले : स्वयंपाक न केल्याने पत्नीचाच केला खून

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !