अजित पवारांना पुन्हा मिळणार उपमुख्यमंत्री पदाची संधी


मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळण्याबाबत शिक्कामोर्तब झालं आहे. अजित पवारांसोबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव चर्चेत होतं. मात्र आमदारांच्या आग्रहामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार असल्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानं अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाणार नाही, अशी चर्चा होती. बंडाची शिक्षा म्हणून अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदापासून दूर ठेवलं जाईल. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांचे विश्वासू असलेल्या जयंत पाटील यांना संधी देण्यात आली, असं म्हटलं जातं होतं. मात्र आमदारांचं समर्थन, प्रशासनावर असलेली मजबूत पकड यामुळे अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची दाट शक्यता आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !