MLA Eknathrav Khadse भुसावळ पालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा : अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेंचा पदाधिकारी, माजी नगरसेवकांना सल्ला


Get ready for Bhusawal Municipal Elections : Complete the incomplete works immediately भुसावळ : पालिकेच्या निवडणुका पूढे लोटल्या गेल्या तरी आज ना उद्या त्या होणार आहेत, यामुळे आजपासूनच तयारीला लागा, मिळालेल्या वेळेचा सद्उपयोग करुन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचा. शहरातील राहिलेली अपूर्ण कामे पूर्ण करा, असा सल्ला माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेतेे आमदार एकनाथ खडसे (MLA Eknathrav Khadse) यांनी शहरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांना दिला. शनिवारी शहरातील माजी नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी मुक्ताईनगर येथे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांची विधानपरीषदेवर निवडून आल्यानंतर सत्कारानिमित्त अनौपचारीक भेट घेतली. यावेळी त्यांनी हा सल्ला दिला.

यांची होती उपस्थिती
विधान परीषदेवर निवडून आल्यानंतर माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे (MLA Eknathrav Khadse) यांची शनिवारी शहरातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आदींनी शनिवारी मुक्ताईनगर येथे जावून भेट घेतली. या अनौपचारीक भेटीत माजी स्विकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, प्रमोद नेमाडे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, देवेंद्र वाणी, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी, पुरुषोत्तम नारखेडे, दिनेश नेमाडे, किरण कोलते, संतोष चौधरी (दाढी), गुड्डू अग्रवाल, शफी पहेलनवान, मुन्ना तेली, शरीफ ठेकेदार, उसामा खान, राहुल मकासरे, सविता आहिरे, विजय सुरवाडे, आरिफ गनी, सिकंदर खान, प्रा. जतीन मेढे आदी उपस्थित होते.

मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन
यावेळी खडसे यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा केली. निवडणूक आज ना उद्या होणारच यामुळे आतापासून कामाला लागा. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचा, गावातील अपूर्ण राहिलेले कामे असतील त्या पूर्ण करण्याची संधी यामुळे मिळाली आहे. यामुळे कामे पूर्ण करुन वेळेचा सद्उपयोग करून घ्या. या काळात मतदार याद्यांचा अभ्यास करुन मतदारांपर्यंत पोहचा, असा सल्लाही त्यांनी (MLA Eknathrav Khadse) दिला, अशी माहिती माजी स्विकृत नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !