A 49-year-old woman from Pachora died after falling under the train पाचोर्‍यातील प्रौढ महिलेचा राजधानी एक्स्प्रेसखाली आल्याने मृत्यू


A 49-year-old woman from Pachora died after falling under the train पाचोरा : पाचोरा शहरातील 49 वर्षीय महिलेचा राजधानी एक्सप्रेसखाली आल्याने चिरडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेसहा वाजता पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ घडली. याबाबत पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुनीता सुरेश पाटील (49, पाचोरा) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

भुसावळ पालिका निवडणुकीसाठी सज्ज व्हा : अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करा

रेल्वेखाली आल्याने मृत्यू
पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील मूळ रहिवासी व हल्ली पाचोरा शहरातील स्वामी लॉन्सजवळ, भडगाव रोड येथील रहिवासी व सेवानिवृत्त ग्रामविस्तार अधिकारी सुरेश पाटील यांच्या पत्नी सुनीता सुरेश पाटील (49) या चार दिवसांपूर्वी आपल्या तीन जेठाण्यांसह पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या नणंदच्या ओटी भरण्याचा कार्यक्रमास गेल्या होत्या. ओटी भरण्याचा कार्यक्रम आटोपून शनिवार, 16 जुलै रात्री 11 वाजेच्या सुमारास कोल्हापूरहुन गोंदियाकडे जाणार्‍या डाऊन महाराष्ट्र एक्सप्रेस (क्रमांक 11039) ने पाचोरा येण्यासाठी निघाल्या होत्या. दरम्यान रविवार, 17 जुलै रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस ही सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी पाचोरा रेल्वे स्थानकावर दाखल झाल्यानंतर एक्स्प्रेसच्या शेवटी असलेल्या महिला राखीव जनरल डब्यात बसलेल्या तीन जेठाण्या व सुनीता पाटील या प्लॅटफार्मवर उतरल्यानंतर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या मागुन अप लाईन क्रॉस करुन जात असतांना तीन जावा ह्या दुसर्‍या साईडच्या अप साईडच्या प्लॅटफार्म वर चढल्या तर सुनीता पाटील यांच्याकडे बॅगांचे ओझे होते. याच वेळी दिल्लीहून मुंबईच्या दिशेने जाणारी राजधानी एक्सप्रेस (क्रमांक 22222) ही भरधाव वेगाने येत असल्याचे सुनीता पाटील यांच्या लक्षात येताच त्यांची धावपळ उडाली व राजधानी एक्सप्रेसखाली आल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. मयत सुनीता सुरेश पाटील यांच्या पश्चात्य पती, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे. घटनेप्रकरणी लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्र, पाचोरा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास प्रभारी अधिकारी चाळीसगावचे ए. पी. आय. किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा रेल्वे स्टेशनचे ए. एस. आय. ईश्वर बोरुडे हे करीत आहे.


पर्यायी ओव्हर ब्रीज मंजूर मात्र कामाअभावी निष्पांपाचे जाताय प्राण
पाचोरा रेल्वे स्थानकावरुन प्रवाशांना शहराकडे तसेच भडगाव रोडकडे जाण्यासाठी एकच ओव्हर ब्रीज आहे. रेल्वेतुन उतरल्यानंतर शहराकडे तसेच भडगाव रोडकडे वास्तव्यास असलेल्या प्रवाशांना आपल्या प्रवाशी बॅगांसह त्या एकमेव ओव्हर ब्रीजपर्यंत जाणे मोठे जिरकीचे असल्याने पर्यायी मार्ग म्हणून प्रवाशी रेल्वे लाईन ओलांडून जात असतात. याआधीही अशा प्रकारामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमावाव लागला आहे. पाचोरा रेल्वे स्थानकावर जाण्या – येण्यासाठी ओव्हर ब्रीज मंजुर असुन सुद्धा रेल्वे प्रशासनाने त्याचे काम सुरू केले नसल्याने प्रवासी वर्गामध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

गिरणा पात्रात बुडाल्याने 16 वर्षीय मुलाचा मृत्यू

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !