शेतकर्‍याने शेतातच मृत्यूला कवटाळले : भोकर गावावर शोककळा


Farmer Died in The Field : Bhokar Village Mourning जळगाव : जळगाव तालुक्यातील भोकर येथील 42 वर्षीय शेतकर्‍याने शेतात दोरीने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. राजेंद्र मधुकर चौधरी (42, भोकर, ता.जळगाव असे) मयत शेतकर्‍याचे नाव आहे.

भोकर गावावर शोककळा
जळगाव तालुक्यातील भोकर येथे राजेंद्र चौधरी हे कुटुंबियांसह वास्तव्यास होते. शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. रविवार, 17 जुलै रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे गाढोदा रोडवरील शेतात गेले असता त्यांचा मुलगा धिरज याने त्यांना काही कामासाठी फेान लावला परंतु त्याचे वडील राजेंद्र चौधरी हे फोन उचलत नसल्याने धीरज हा आजोबांना घेवून शेतात गेला. यावेळी त्याला आपल्या वडीलांनी शेतातील बांधावर असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे रविवारी सकाळी 11 वाजता दिसून आले.


जळगाव तालुका पोलिसात नोंद
धीरज व त्याच्या आजोबांनी राजेंद्र चौधरी यांना उचलून धरत झाडाचा दोर कापून त्यांना खाली उतरविले असता तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट होते. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी ईश्वर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पाचोर्‍यातील प्रौढ महिलेचा राजधानी एक्स्प्रेसखाली आल्याने मृत्यू

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !