Maharashtra ST Bus coming from Indore to Pune falls off Khalghat Sanjay Setu Narmada river in Madhya Pradesh; Bodies of 12 passengers were found अमळनेर आगाराची बस नर्मदा नदीत कोसळली : 12 प्रवाशांना जलसमाधी

मृतांचा आकडा वाढण्याची भीती : बहुतांशी प्रवासी महाराष्ट्रातील रहिवासी


BUS IN NARMADA RIVER इंदौर : अमळनेर आगाराची इंदौर-अमळनेर बस नियंत्रण सुटल्याने नर्मदा नदीत कोसळून 12 प्रवासी ठार झाले. या घटनेने महाराष्ट्रासह मध्यप्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील खलघाट येथे सोमवार, 18 रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. दरम्यान,  स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

खलघाट बस अपघात : मयतांची ओळख पटली : चार मयत प्रवासी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी

नियंत्रण सुटल्याने बस कोसळली नदीत
आग्रा-मुंबई महामार्गावरील इंदौरपासून 80 किलोमीटर अंतरावर सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. महाराष्ट्रातील अमळनेर आगाराची ही बस इंदौरहून अमळनेर येथे येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ज्या पुलावर अपघात घडला त्या पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) तर अर्धा भाग खलटाका (खरगोन) मध्ये येतो. क्रेनच्या मदतीने कोसळलेली बस नदीतून बाहेर काढण्यात आली तर काही प्रवाशांना वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात आले.


अपघातापूर्वी हॉटेलवर थांबली बस
अमळनेर आगाराची इंदौर-अमळनेर बस (एम.एच.40 9848) ही सोमवारी सकाळी नऊ वाजता खलघाटजवळील दुध बायपासजवळ एका हॉटेलवर नास्ता करण्यासाठी थांबली होती व त्यावेळी काही प्रवाशांना नास्ताही केला मात्र त्यानंतर थोड्याच वेळात बस अनियंत्रीत झाल्याने पुलाखाली कोसळल्याने 13 प्रवासी ठार झाले तर अनेक बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

मृतांचा आकडा वाढण्याची भीती
अमळनेर आगाराची अमळनेर-इंदौर बस (एम.एच.40 एन.9848) ही परतीच्या प्रवासात इंदौरहून अमळनेरकडे येत असताना खलघाटजवळ पुलावर येताच अनियंत्रीत आल्याने नर्मदा नदीत कोसळली. बसवर चालक चंद्रकांत एकनाथ पाटील तर वाहक प्रकाश श्रावण चौधरी होते. पंढरपूर येथून प्रवाशांना घेवून परतल्यानंतर ही बस इंदौरकडे रवाना करण्यात आली होती मात्र सोमवारी सकाळच्या सुमारास नर्मदा नदीपात्रात बस कोसळल्याने 12 प्रवाशांचा मृत्यू ओढवला तर अनेक बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

एस.टी.चालक-वाहकासह 12 प्रवासी ठार : अपघातातील मयत असे

1) एस.टी. वाहक प्रकाश श्रावण चौधरी (शारदा कॉलनी, अमळनेर)

2) एस.टी.बस चालक चंद्रकांत एकनाथ पाटील (45, अमळनेर)

3) अविनाश संजय परदेशी (पाटणसराई, ता.अमळनेर)

4) निंबाजी आनंदा पाटील (60, पिळोदा, ता.अमळनेर)

5) आरवा मुर्तजा बोरा (27, मूर्तिजापुर, अकोला, माहेर अमळनेर)

6) राजू तुळशिराम (रावतफाटा, चितोडगढ, राजस्थान)

7) जगन्नाथ हेमराज जोशी (68, मुकामपूर मल्लाडा, उदयपूर, राजस्थान)

8) चेतन रामगोपाल जांगीड (नाकगलकला गोविंदगढ, जयपूर, राजस्थान)

9) सैफउद्दीन अब्बासअली बोहरा (मुरानी नगर, इंदौर, मध्यप्रदेश)

10) विकास सतीश बेहरे (33, विरदेल, जि.धुळे)

11) कल्पना विकास उर्फ गुलाबराव पाटील (57, बेटावद, ता.शिंदखेडा)

12) रुख्मिणीबाई नारायण जोशी (बागोर, उदयपूर, राजस्थान)


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !