गावठी बनावटीचे तीन पिस्टल व नऊ काडतुसांसह दोघे शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात


Two arms smugglers nabbed with three village kattas: performance of Shirpur taluka police शिरपूर : कट्ट्यांची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने महामार्गावरून धुळ्याकडे मोटारसायकल वरून चोरटी वाहतूक करणार्‍या दोघांच्या मुसक्या आवळत गावठी बनावटीचे तीन पिस्टल व 9 जिवंत काडतुस जप्त करीत ,1 लाख 75 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई तालुका पोलिसांनी केली. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शनिवारी सायंकाळी तालुक्यातील दहिवदजवळ केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिवारी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तालुका पोलिसांच्या पथकाने सायंकाळी दहिवद गावाजवळ सापळा रचून संशयीत (एम.एच.41 बी.जे.0839) क्रमांकाच्या पल्सर गाडी थांबवून दुचाकीवरील संशयितांची तपासणी केली.तपासणीत संशयीत प्रशांत शशिकांत अहिरे (27, रा.टाकळी रोड, रामदास स्वामी नगर, नाशिक उप नगर, नाशिक) आणि प्रफुल भानुदास जगताप (22, रा.हिसवड बुद्रुक, ता.नांदगाव) यांच्या ताब्यातुन गावठी बनावटीचे 3 पिस्टल आणि 9 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. एकूण एक लाख 75 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


शिरपूर पोलिसात गुन्हा
नाईक आरीफ खान रमजान खान पठाण यांनी शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने प्रशांत शशिकांत अहिरे व प्रफुल भानुदास जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे व तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप पाटील, भिकाजी पाटील, संदीप शिंदे, योगेश मोरे, जयेश मोरे, इसरार फारुखी, आरीफ खान रमजान खान पठाण यांच्या पथकाने केली.

 

खलघाट बस अपघात : आठ मयतांची ओळख पटली : चार मयत प्रवासी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !