यावल पालिकेतर्फे फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी : पथ विक्रेत्यांना सर्वेक्षणासाठी आवाहन
यावल : शहरात दिनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान अंतर्गत फेरीवाला (पथविक्रेता) धोरणाची अंमलबजावणी नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यावल शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण नगरपालिकेच्या माध्यमातुन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हमेंटमार्फत सुरू आहे. आजपर्यंत 242 फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
खलघाट बस अपघात : आठ मयतांची ओळख पटली : चार मयत प्रवासी जळगाव जिल्ह्यातील रहिवासी
सर्वेक्षण करून घेण्याचे आवाहन
फेरीवाला सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने यावल नगरपालिकेने ज्या पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण झालेले नाही त्यांनी आपले सर्वेक्षण रविवार, 24 जुलै 2022 पर्यंत करून घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी परवेज खान ( 9970551015) व ईस्माईल खान (8855807786), गजानन महाजन (7020742248) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.

हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले : तापी काठावर सतर्कतेचा इशारा

