मुक्ताईनगरात नगरपंचायतीत शिंदे गटाचा होणार नगराध्यक्ष

शिवसेनेतर्फे पियूष भागवत मोरे यांनी सादर केला अर्ज : बिनविरोध निवडीची शक्यता


In Muktainagar, the Shinde group will be the mayor of the municipal council मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीतील भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जात प्रमाणपत्राअभावी अपात्र झाल्याने रीक्त नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सोमवार, 18 जुलै रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे पियूष भागवत मोरे (महाजन) यांनी उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्याकडे सादर केला. सोमवारी दुपारी दोन वाजेनंतर पीठासीन अधिकारी तथा भुसावळ उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे दाखल अर्ज वैध असल्याचे घोषित केले. दरम्यान, मुक्ताईनगर नगरपंचायतीत राज्यातील पहिलाच शिंदे गटाचा नगराध्यक्ष मुक्ताईनगरातून निवडून येणार असल्याने नगराध्यक्ष निवडीबद्दल उत्सुकता वाढली आहे.

यांची होती उपस्थिती
जिल्हा परीषदेचे माजी समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा नगरसेवक ललित महाजन, अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, नगरसेवक तथा गटनेते निलेश शिरसाट, नगरसेवक तथा गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक तथा उपगटनेते संतोष कोळी, सार्वजानिक बांधकाम सभापती तथा नगरसेवक संतोष मराठे, पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे, महिला बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सविता भलभले, सार्वजानिक आरोग्य व मलनिस्सारण सभापती तथा नगरसेवक नुसरत बी.महेबुब शेख, नगरसेविका शबाना बी.अब्दुल आरीफ, नगरसेविका बिलकीस बी.अमानउल्ला खान, नगरसेवक डॉ.प्रदीप पाटील, शहर संघटक वसंत भलभले, आरीफ आझाद, राजेंद्र तळेले, शकुर जमदार, अनिकेत शुरपाटणे, रोहन बोदडे आदींसह असंख्य शिवसेना, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवार., 22 जुलै रोजी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पियुष मोरे यांची निवड झाल्यास ते सर्वात तरुण म्हणजे 28 वर्षीय नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील.


गावठी बनावटीचे तीन पिस्टल व नऊ काडतुसांसह दोघे शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !