सावद्यातील तरुणाचा मोहमांडली तलावात बुडाल्याने मृत्यू


A young man from Savada died after drowning in Mohmandali lake सावदा : मोहमांडली (ता.यावल) येथील तलावात घसरून पडल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. घनश्याम राजेंद्र पाटील (वय 25) असे मृत तरुणाचे नाव आहे.

पिंपळकोठा येथील कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या 

पाय घसरून पडल्याने मृत्यू
घनश्याम हा त्याच्या मित्रांसोबत न्हावी येथून जवळ असलेल्या मोहमांडली येथे फिरायला गेला होता. तेथे त्याचा पाय घसरल्याने तो तलावात बुडाला. मित्र व नागरिकांनी त्यास वाचवण्याचे प्रयत्न केले. परंतु ते अपयशी ठरले. घनश्याम हा बी.कॉम.च्या दुसर्‍या वर्षात शिक्षण घेत होता. येथील महावीर चौकामध्ये पाणीपुरीचे दुकान चालवून व घरी मोबाईल दुरुस्ती करून तो चरितार्थासाठी मदत करत होता. घनश्यामचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला, असे पोलिसांनी सांगितले.


संततधार पावसाने नागझिरी नदीला पूर : रावेरात घरांमध्ये शिरले पाणी 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !