फुलगाव ओव्हर ब्रिज जवळील अपूर्ण कामांच्या निषेधार्थ 21 रोजी रास्ता रोको

महामार्ग प्राधिकरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात युवा स्वाभिमान पार्टी संतप्त


वरणगाव : फुलगाव येथील ओव्हर ब्रिज जवळील (चॅनल क्र.391) राष्ट्रीय महामार्ग क्र.06 वरील तसेच सर्विस रोडवरील अर्धवट स्वरूपाच्या कामांच्या निषेधार्थ लक्ष वेधण्यासाठी गुरुवार, 21 जुलै रोजी रास्ता रोको व ठिय्या आंदोलन करून आत्मदहन आंदोलनाचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीतर्फे देण्यात आला आहे. या संदर्भात संबंधिताना निवेदन देवून इशारा देण्यात आला आहे.

अपूर्ण कामांमुळे संताप
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक क्र.06 विभागांतर्गत येणार्‍या रस्त्याची , सर्विस रस्त्याचे ब्रिज, गटारी विशेषतः 319 चॅनेल क्रमांक जवळील लाईट, मोठे हॅलोजन ,बस स्टॅन्ड , गतिरोधक ही कामे अपूर्ण आहेत. याबाबत गेल्या काही महिन्यांपासून युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील हे लेखी पाठपुरावा व भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून आहेत. कामांचा दर्जा अत्यंत सुमार असतानाही संबंधित दखल घेत नाही शिवाय तक्रार करून सुद्धा एक ते दीड वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा संबंधित ठेकेदाराचे नाव ब्लॅकलिस्ट किंवा बिल थांबलेले नाही. याबाबत प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा, शैलेंद्र आवारे, अनिल गर्ग व संबंधित अधिकारी यांना वारंवार सांगून सुद्धा दिशाभूल करून टाळाटाळ केली जात आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना मोडलेला बस थांबा व बस स्टॉप पुन्हा बांधून न दिल्याने विद्यार्थी नागरीक, ज्येष्ठ नागरीक यांचे हाल होत आहेत. सर्विस रोडवर बायपासच्या ठिकाणी लाईट व गतिरोधक व्यवस्था नसल्याने अपघात होऊन काही लोक मृत्यू पावले आहे त्याचप्रमाणे अंडर बायपासमध्ये पाणी साचल्याने व पूल अरुंद असल्याने येणार्‍या जाणार्‍या वाहनधारक व नागरीकांचे प्रचंड मानसिक, शारीरीक हाल होत असल्याने त्याबाबतचे लेखी निवेदन 15 जुलै 2022 ला देऊन सुद्धा प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा व संबंधित संपूर्ण अधिकारी वर्ग दुर्लक्ष केले आहे शिवाय जिल्हाधिकारी यांना सुद्धा पत्र दिले असून प्रशासनाने याबाबत अद्यापही दखल घेतली नसल्याने नागरीकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे.


लक्ष वेधण्यासाठी आंदोलन
अपूर्ण कामे पूर्ण होण्यासंदर्भात तसेच दोषींवर कारवाई होण्यासंदर्भात गुरुवार, 21 जुलै सकाळी 11 वाजता रास्ता रोको व ठिय्या आंदोलन तसेच नुकसानग्रस्त शेतकरी नारायण लोणे हे आत्मदहन करणार आहेत. निवेदन अर्जावर शेकडांच्या सह्या आहे. जास्तीत-जास्त लोकांनी सहभाग घ्यावा व हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, ज्येष्ठ नागरीक ओंकार दगडू सोनार, ज्येष्ठ नागरीक प्रल्हाद जाधव, ज्येष्ठ नागरीक नारायण लोणे, ज्येष्ठ नागरीक बाळू शांताराम चौधरी, दीपक धनराज चौधरी, विद्यार्थी ओम बोरनारे, कमला सुतार, दीपाली पाटील, अक्षय शिंदे, भावेश चव्हाण, दीपांशू लोणे, पुष्कर पाटील तसेच संपूर्ण मिल्ट्री कॉलनी, पुष्पलता कॉलनी, शिव कॉलनतील रहिवाशांसह फुलवासीयांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !