काय सांगता ! : महिला आमदारांनाच घातला आर्थिक गंडा
What do you say! : Women MLAs have been hit with financial scams पुणे : आई आजारी असल्याचे सांगत भामट्याने चार महिला आमदारांना ठगवले. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
फेक कॉल लक्षात येताच तक्रार
आपली आई आजारी असल्याचा बहाणा करीत एका अज्ञात व्यक्तीने या महिला आमदारांना मदत मागितली होती. वर नमूद केलेल्या चौघा महिला आमदारांनी मदत म्हणून ती रक्कम ऑनलाइन माध्यमातून दिली मात्र तो फेक कॉल असल्याचे लक्षात आल्यानंतर आमदारांनी तक्रार दिली होती. या अनुषंगाने पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुकेश राठोड असे आरोपीचे नाव असून आता त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.
