मंत्री पदासाठी 100 कोटी रुपयांचे आमीष : चौकडी अडकली जाळ्यात


100 Crores Lure For Minister Post : Quartet Trapped मुंबई : मंत्री पद मिळवून देण्यासाठी 100 कोटी रूपयांचे आमीष दाखविणार्‍या चौकडीला अटक करण्यात आली. विशेष बाब म्हणजे यात तीन आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. या संदर्भातील वृत्त एबीपी-माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्तानुसार, मंत्री मंडळात मंत्री पद मिळवून देण्याच्या नावाखाली आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचे सांगितले. तसेच मोठ्या मंत्र्यांनी त्यांचा बायोडेटा विचारला आहे, असेही सांगितले. यानंतर संबंधित आरोपींनी आमदारांशी दोन ते तीन वेळा फोनवर बोलून सांगितले की, मंत्री मंडळात मंत्रिपद हवे असेल तर 100 कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. यानंतर 17 जुलै रोजी आरोपींनी आमदारांची ओबेरॉय हॉटेलमध्ये भेट घेतली.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अखेर अटक

खंडणी विरोधी पथकाने केली कारवाई
या सर्व प्रकाराची माहिती मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाला देण्यात आली. या अनुषंगाने पोलिसांनी सापळा रचून एका आरोपीला पकडले आणि त्याच्या चौकशीत आणखी 3 आरोपींची नावे समोर आली. यात रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी, सागर विकास संगवई, आणि जाफर अहमद रशीद अहमद उस्मानी यांना अटक करण्यात आली आहे. या संदर्भात एका आमदाराच्या पीएने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


परप्रांतीय मोबाईल चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !