Playing with patients’ lives without degrees : Action against six doctors in Chalisgaon taluka पदवी नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळ : चाळीसगाव तालुक्यातील सहा डॉक्टरांवर कारवाई

बोगस डॉक्टरांबाबत वाढल्या होत्या तक्रार : दोघांनी काढला पळ


Six Munnabhai doctors from Chalisgaon taluka in custody चाळीसगाव : तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा वाढलेला सुळसुळाट पाहता या संदर्भात तक्रारी प्राप्त होताच सहा मुन्नाभाई डॉक्टरांवर कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांना कोठडीत टाकण्यात आले तर दोघे पसार होण्यात यशस्वी झाले. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील डॉ.संजय साळुंखे, डॉ.मृणाल टी.सरकार तर उपखेड येथील तन्मय दीपक पाठक, पोहरे येथील शहाजात कोमल मुजुमदार या चौघासह आणखी दोन जणांचा कारवाई झालेल्यांमध्ये समावेश आहे.

पदवी नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळ
चाळीसगाव तालुक्यात वैद्यकीय पदवी नसतानाही रुग्णांच्या जीवाशी खेळणार्‍या 8 बोगस डॉक्टरांवर बुधवारी दिवसभरात कारवाई झाल्याने सुज्ञ जनतेतनू समाधान व्यक्त होत आहे. यातील सहा बोगस डॉक्टरांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तर दोन बोगस डॉक्टर पसार झाले आहेत.


खाजगी डॉक्टर संघटनेची तक्रार
खाजगी डॉक्टरांच्या संघटनेने चाळीसगाव तालुक्यात बोगड डॉक्टरांबद्दल आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार बुधवारी ंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या तालुकास्तरीय बोगस डॉक्टर कमिटीच्या सहा भरारी पथकांतर्गत एकूण 18 जणांनी तालुक्यात कारवाई केली. यात 8 पैकी सहा बोगस डॉक्टरांना पोलिसांच्या स्वाधीन केले असून दोन बोगस डॉक्टर पसार झाले.

यांच्या पथकाने केली कारवाई
या बोगस डॉक्टरांविरोधात चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. तालुका आरोग्य अधिकारी देवराम लांडे, डॉ.संदीप निकम, दीपक वाणी, विलास भोई, आर.आय.पाटील, डॉ.धीरज पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

फागण्यात एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला तर कापडणे गावातून साडेपाच लाखांची रोकड लंपास


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !