Offensive photos of rape of a young woman in Dhule went viral धुळ्यात तरुणीवर बलात्कार करीत आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल
धुळे : शहरातील एका भागातील उच्च शिक्षीत तरुणीवर अत्याचार करून नंतर आक्षेपार्ह अवस्थेतील फोटे पीडीतेच्या मैत्रीणीला व आतेभावाला पाठवून बदनामी करण्यात आली. या प्रकरणी आझादनगर पोलिसांत पीडीतेच्या फिर्यादीवरुन अहमदनगर येथील काकासाहेब हरीदास दहिफळे या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पदवी नसताना रुग्णांच्या जीवाशी खेळ : चाळीसगाव तालुक्यातील सहा डॉक्टरांवर कारवाई
आक्षेपार्ह फोटो काढत अत्याचार
तरुणीच्या फिर्यादीनुसार आरोपी काकासाहेब दहिफळे या तरुणाने ऑक्टोबर 2021 मध्ये धुळ्यातील ग.नं. 5 मधील ‘युनिक इन ओयो’ या हॉटेलमध्ये नेत मारहाण करीत तरुणीला विवस्त्र करून त्याच्यासोबत सेल्फी घेली तसेच बळजबरीने शारीरीक संबंध निर्माण केले व त्याची वाच्यता केल्यास तुझे फोटो व्हायरल करेल व तुझ्या घरच्यांना सांगुन देईल, अशी धमकी दिली. त्यानंतर 18 जुलै 2022 रोजी तरुणीची मैत्रीण व आतेभावाला टेलिग्रामवर तरुणीचे फोटो पाठवून शिवीगाळ करीत धमकी दिली. त्यानुसार आझादनगर पोलिस ठाण्यात काकासाहेब हरीदास दहिफळे (रा.अहमदनगर) या तरुणाविरोधात भादंवि कलम 376, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास एल.एस.करंकार करीत आहेत.
