NCP Leader Praful Patel’s House In Worli Seized ईडीची मोठी कारवाई : आता राष्ट्रवादीच्या या बड्या नेत्याच्या मालमत्तेवर आली टाच


NCP Leader Praful Patel’s House In Worli Seized  मुंबई : ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची काही दिवसांपूर्वी चौकशी केल्यानंतर गुरुवारी त्यांचे वरळीतील घर जप्त केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. . वरळीतील सीजे हाऊसमधील चार मजले जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले तर इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडीने कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

2019 मध्ये झाली होती चौकशी
प्रफुल पटेल यांची 2019 मध्ये चौकशीही झाली होती. इक्बाल मिर्ची प्रकरणी हे आरोप होते. त्यानंतर प्रफुल पटेल यांनी एक पत्रकार परीषद घेतली होती आणि त्यानंतर आपलं म्हणणं मांडलं होतं. आता याच प्रकरणात ईडीने चार मजले म्हणजेच प्रफुल पटेल यांचं घर जप्त केले. अंडर वर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात समजल्या जाणार्‍या इकबाल मिर्चीचे फरार असताना 2013 मध्ये लंडनमध्ये निधन झाले. त्याने 1986 मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे 200 कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती. त्यांच्या चौकशीमध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याकडे सीजे हाऊसच्या तिसर्‍या व चौथ्या मजल्यावर दोन फ्लॅट आहेत. 2007 मध्ये त्याच्या विकास करार होवून हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली जाईल. दरम्यान, मिर्चीच्या मालमत्ता विक्री व्यवहारात कसलाही संबंध नसल्याचा दावा प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता.


शिंदे सरकारची मोठी घोषणा : यंदाच्या गणेशोत्सवासह दहिहंडीवर कुठलेही निर्बंध नाहीच


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !