Rape case: Suspect in Soygaon taluka in Pimpalgaon Hareshwar police net अत्याचार प्रकरण : सोयगाव तालुक्यातील संशयीत पिंपळगाव हरेश्‍वर पोलिसांच्या जाळ्यात


Suspects in torture case arrested पाचोरा : पिंपळगाव हरेश्‍वर पोलिस ठाणे हद्दीत अत्याचार प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील पसार असलेल्या संशयिताला अखेर महिनाभराने अटक करण्यात आली. अभिमान ऊर्फ आबा अंबादास वाघमारे (कोळी, 26, रा.घोसला, ता.सोयगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

गुन्हा दाखल होताच संशयीत पसार
संशयीत अभिमान ऊर्फ आबा अंबादास वाघमारे (कोळी) (वय 26, रा. घोसला, ता. सोयगाव) हा गुन्हा दाखल झाल्यापासून पसार झाला होता. त्यामुळे पोलिसांसमोर संशयिताचा शोध घेण्याचे आव्हान होते. संशयिताच्या अटकेसाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे व पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक गोकूळ सोनवणे, कॉन्स्टेबल जितेंद्र पाटील यांनी शोध घेतला. गुप्त माहितीवरून संशयिताला पोलिसांच्या पथकाने 16 जुलैला ताब्यात घेत, पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात हजर केले.


महिनाभरानंतर आरोपी जाळ्यात
गुन्हा घडल्यानंतर महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतर पोलिसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार हे करत आहेत.

बिग ब्रेकींग : उच्च न्यायालयाचे आदेश येताच मुक्ताईनगरात नगराध्यक्ष निवडीला स्थगिती


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !