भुसावळातील प्रौढाची सोशल मीडियात बदनामी करीत मागितली दहा हजारांची खंडणी
An Adult in Bhusawla Was Defamed on Social Media and Demanded a Ransom of Ten Thousand भुसावळ : शहरातील प्रौढाच्या मोबाईलमधील डाटा एकाने चोरत मोबाईलमध्ये असलेल्या महिलांच्या नंबर अश्लिल मजकूरच्या मदतीने सोशल मीडियात व्हायरल करीत दहा हजारांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गुरूवार, 21 जुलै रोजी सायंकाळी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचार प्रकरण : सोयगाव तालुक्यातील संशयीत पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या जाळ्यात
अनोळखी मोबाईलमधील डाटा चोरला
भुसावळ शहरात 40 वर्षीय प्रौढ व्यक्ती आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. 21 जुलै रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या व्हॉटसप क्रमांकावर अनोळखी व्यक्तीने मॅसेज केला व 10 हजाराची खंडणीची मागणी केली. दरम्यान प्रौढाने पैशांची पुर्तता न केल्याने समोरील अनोळखी व्यक्तीने प्रौढाच्या मोबाईलचा डाटा चोरून त्यात महिलांचे मोबाईल क्रमांकासोबत अश्लील भाषा वापरली आणि सोशल मीडियात व्हारयल करून दिले. त्यामुळे त्यांची बदनामी करून 10 हजाराची मागणी केल्याने प्रौढ व्यक्तीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले करीत आहे.
