In Jalgaon , The Accused Drank Alcohol In The Lock : Two Policemen Were Finally Suspended जळगावात आरोपींना लॉकअपमध्ये दारु पाजली : दोघा पोलिसांचे अखेर निलंबन
In Jalgaon , The Accused Drank Alcohol In The Lock : Two Policemen Were Finally Suspended जळगाव : पोलिस लॉकअपमध्ये आरोपींची बडदास्त ठेवून त्यांना दारू पाजल्याप्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दोघा पोलिसांना निलंबीत केल्याने जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. निलंबीत कर्मचार्यांमध्ये जळगाव शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी करुणासागर अशोक जाधव व एमआयडीसी पोलिस ठाण्याचे मिलिंद डिगंबर सोनवणे यांचा समावेश आहे.
भुसावळातील हद्दपार खरात बंधू पोलिसांच्या जाळ्यात
बनावट गुन्ह्याप्रकरणी संशयीत अडकले
जळगावच्या शाहू नगरातील बालकदास बाबा आणि त्यांच्या सहकार्यांनी बनावट गुन्ह्यात अडकवण्याचे कृत्य काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते. यात राजेश रोहितलाल मिश्रा आणि रामेश्वर मिश्रा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. या दोघांनी त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर इम्रानखान मुस्तकीन खान याला खोटी फिर्याद द्यायला लावली होती. तथापि, चौकशीत हा बनाव समोर येथून मिश्रा बंधूंना अटक करण्यात आली. त्यांची पोलि लॉकअपमध्ये चांगलीच बडदास्त ठेवण्यात आली असून चक्क पोलीसांनीच त्यांना मद्य पुरवल्याची तक्रार करण्यात आली व पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या चौकशीतून हा प्रकार समोर आला होता. आयपीएस कुमार चिंथा यांनीदेखील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर मिलिंद सोनवणे आणि करूणासागर जाधव यांनी राजेश मिश्रा आणि रामेश्वर मिश्रा यांना पोलिस स्थानकातच पाण्याच्या बाटलीतून दारू दिल्याचे दिसून आले. याची दखल घेऊन डॉ.प्रवीण मुंढे यांनी या दोन्ही कर्मचार्यांना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सोमवारी निलंबीत केले आहे. निलंबनाच्या काळात त्यांना जिल्हा पोलीस मुख्याल यात हजेरी लावण्याचे अनिवार्य करण्यात आले आहे.

29 गुन्हे प्रलंबित ठेवणार्या कर्मचार्याचेही निलंबन
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी अतुल कौतुक पाटील यांच्याकडे तब्बल 29 गुन्हे प्रलंबित असल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांनादेखील निलंबीत केल्याने गुन्हा प्रलंबित ठेवणार्या कर्मचार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
गिरीश महाजन म्हणाले : एकनाथ शिंदे हेच खरे शिवसैनिक

