Fund of 4 crores for commercial complex in Muktainagar : Follow up of MLA Chandrakant Patil Successful मुक्ताईनगरसह बोदवड व सावद्यातील विविध कामांसाठी 20 कोटीचा निधी मंजूर
मुक्ताईनगरातील व्यापारी संकुलासाठी चार कोटींचा निधी : आमदारांचा पाठपुरावा यशस्वी
20 crores sanctioned for various works in Bodwad and Sawda along with Muktainagar मुक्ताईनगर : राज्यात सत्तांतर झाल्यांनतर राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुक्ताईनगर मतदार संघातील सावदा, बोदवड व मुक्ताईनगर पालिका हद्दीतील रखडलेल्या पायाभूत व मुलभूत सुविधांसाठी नमूद कामांच्या सूचीनुसार निधीसह मंजुरीची मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाला मोठे गिफ्ट दिले आहे. सुमारे 20 कोटींच्या विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. यात मुक्ताईनगर शहरातील दिवा स्वप्न ठरलेले व्यापारी संकुल (शॉपिंग कॉम्प्लेक्स) साठी चार कोटींच्या तरतुदीसह मंजुरी मिळाली आहे. मुक्ताईनगर शहर टपरीमुक्त करून छोटे-छोटे व मोठे व्यावसायीक यांना न्याय देणार असल्याचे वचन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. त्या वचनपूर्तीच्या दृष्टीने त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
भरीव निधीमुळे होणार विकासकामे
सोमवार, 25 जुलै रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयात व्यापारी संकुल व मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासकीय इमारतीसह विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे. बोदवड येथील तेली समाजासाठी संत जगनाडे महाराज सांकृतिक सभागृह बांधकाम करणे व संत सेना महाराज सभागृहास संरक्षण भिंत बांधकाम करणे आदी विकास कामांना भरीव निधीच्या तरतुदी सह मंजुरी मिळाली आहे.



मुक्ताईनगर, बोदवड व सावदा येथील मंजूर विविध विकास कामे अशी
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीतील नगरपंचायत मालकीच्या जागेत मुख्य चौकात व्यापारी संकुल बांधकाम करणे, मुक्ताईनगर नगरपंचायतीची प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे, यासह मुक्ताईनगर सावदा बोदवड नगरपंचायत हद्दीतील विविध विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
सावदा पालिकेसाठी सहा कोटींचा निधी
सावदा शहरातील विविध विकासकामांसाठी सहा कोटी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे. सावदा नगरपरीषद हद्दीतील रजा नगर भागात रस्त्याच्या दुतर्फा गटारी बांधणे, काँक्रिटीकरण करणे, रस्ते बांधणे, ईदगाह येथे काँक्रीटीकरण, साईपार्क भागात काँक्रीटीकरण, स्वामी हॉस्पिटल ते हायवेपर्यत काँक्रीटीकरण, स्टेशन रोड भागात रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे यासह गट क्रमांक 97 मध्ये सांस्कृतिक सभागृह बांधणे, ओपन स्पेसचा विकास, संरक्षण भिंत, नानासाहेब विष्णू हरी पाटील कन्या शाळेस संरक्षण भिंत बांधणे व सुशोभीकरण करणे आदी कामे मंजूर झाली आहेत.