डॉ.शेख जावेद शेख याकुब यांना गांधी सेवा रत्न पुरस्कार प्रदान


यावल : यावल शहरातील शिक्षक शेख जावेद शेख याकुब यांना रविवार, 24 जुलै 2022 रोजी चित्रपट अभिनेते राजपाल यादव तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत गांधी सेवा रत्न पुरस्कार भोपाळ येथे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना शैक्षणिक, सामाजिक, पत्रकारीता, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड अगेन करप्शन यांच्या वतीने दिग्गज मान्यवरांच्या हस्ते मिळाला आहे

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून फिल्म प्रोड्युसर शिरोमणी डू. सौरभ पांडे, इंटरनॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अमेरीकाचे चेअरमन डॉ.जस्वीर सिंग, डॉ.रागिनी पांडे, पूजा निगम, राज्यसभा टीव्ही अँकर समीना अली, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ.जावेद शेख यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. पुरस्काराबद्दल शेख अय्युब, फारुख शाह नोमानी, शेख अल्ताफ, आसीफ शाह, शेख नाजिम, आदिनी शेख यांनी जावेद शेख यांचे अभिनंदन केले आहे.

उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सुनावले : तर एकनाथ शिंदे उद्या पंतप्रधानपदही मागतील !




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !