शिंदे सरकारने शेतकर्यांसाठी घेतला हा मोठा निर्णय : अशी मिळणार वीज बिलात सवलत
The big decision taken by the Shinde government for the farmers : They will get discount in the electricity bill
मुंबई : राज्यातील मंत्री मंडळाचा विस्तार भलेही लांबत असलातरी शिंदे सरकारकडून मात्र अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. बुधवारी राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत राज्यभरातील शेतकर्यांना प्रति युनिट एक रूपया सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच राज्यातील वीज ग्राहकांना प्रिपेड मीटरदेखील आता घेता येणार आहेत. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
वीज ग्राहकांना आता प्रीपेड मिटर्स
यातील निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. ते म्हणाले की, नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना 50 हजार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शेतकर्यांना वीज दरात उपसा सिंचनमध्ये प्रति युनिट एक रुपयांची सवलत देण्यात आली आहे. यासोबत, राज्यात वीज वितरण यंत्रणा सुधारवून ग्राहकांना स्मार्ट व प्रिपेड मीटर्स प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.



केसेस मागे घेण्याचा निर्णय
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गणपती आणि दहीहंडी उत्सवामध्ये ज्या कार्यकर्त्यावर केसेस झाल्या होत्या. त्या मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोरोना काळात ज्यांच्यावर केस झाल्या, त्या देखील मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, ग्रामीण भूमिहीन घरकुल योजनेबाबत निर्णय घेण्यात आला असून आता मोजणी शुल्कात 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.