पावणेतीन लाखांवर वाहन चालकाचा गंडा : अखेर आवळल्या मुसक्या
Driver’s Fraud On Fifty Three Lakhs : Finally, The Smiles Have Opened जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री नेरी येथून एमआयडीसी परीसरातील वेगवेगळ्या तीन कंपनीच्या मालकीचे ठिंबक नळ्यांचे बंडलांचे दोन लाख 81 हजार 400 रूपये घेवून पसार होणार्या संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत. पंकज रघुनाथ सोनवणे (रा.कुसूंबा, ता.जि.जळगाव) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
रक्कम घेवून चालक पसार
जळगाव एमआयडीसीतील प्रभंजन ऑटोमोबाईल कंपनी, रोमीत भक्कम या कंपनीने मिळालेल्या ऑर्डर नुसार जालना येथील कंपनीत पाठविण्यासाठी एकूण 2 लाख 81 हजार 400 रूपये किंमतीचे ठिंबक नळ्यांचे बंडल चालक पंकज रघुनाथ सोनवणे, रा.कुसूंबा, ता.जि. जळगाव) याला वाहन क्रमांक (एमएच 19 एस 8097) मध्ये टाकून रवाना केले होते. दरम्यान, पंकजने सर्व माल पोहोचविला. त्यानंतर जालना येथील व्यापार्यांकडून 2 लाख 81 हजार 400 रूपये रोख घेतले आणि जळगावात येवून गाडी एमआयडीसी परिसरात लावून पसार झाला. संशयीताचा सर्वत्र शोध घेतला परंतू पंकज हा कुठेही आढळून आला नाही. अखेर कंपनीचे मॅनेजर चिराज संजय शहा यांच्या फिर्यादीवरून 5 मार्च 2021 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.



नेरीतून आवळल्या मुसक्या
या गुन्ह्यातील संशयित आरोपी हा जामनेर तालुक्यातील नेरी येथे असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सोमवार, 25 जुलै रोजी रात्री सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस नाईक किशोर पाटील, मुदस्सर काझी, योगेश बारी, मुकेश पाटील, छगन तायडे यांनी संशयित पंकज रघुनाथ सोनवणे रा. कुसूंबा ता.जि. जळगाव याला ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.