माळी समाजातील तरुणांनी स्पर्धा परीक्षेकडे वळावे

कैलास महाजन : भुसावळात माळी समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ


भुसावळ : माळी समाजातील तरुणांनी ध्येय निश्चित करून स्पर्धा परीक्षेकडे वळावे व जिद्दीने यश मिळवून समाजाची सेवा करावी, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य व माळी महासंघ महाराष्ट्र सचिव कैलास महाजन यांनी येथे केले. माळी समाजातील गुणवंतांचा शहरातील संत सावता माळी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त बुधवारी सन्मान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. माळी समाजाच्या लॉनमध्ये झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात सावता महाराज पालखीच्या दिंडीने झाली. यावेळी बहुसंख्य वारकरी त्यात सामील झाले.

तर त्या शिक्षणाचा उपयोग नाही : संदीप महाजन
विद्यार्थ्यांनी आपले करीयर निवडताना त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावावे, असे आवाहन एरंडोल येथील व्याख्याते संदीप महाजन यांनी केले.उच्च शिक्षण घेतले पण आई वडिलांना विसरले तर त्या शिक्षणाचा उपयोग नाही, असेही ते म्हणाले. मंडळाचे सचिव गजेंद्र महाजन यांनी अहवाल वाचन केले.




या मान्यवरांचा झाला सन्मान
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर समाजातील उत्कृष्ट आणि विशेष कार्याबद्दल धीरज राजेंद्र महाजन (एम.डी.), तेजस महाजन (सी.ए.) यांचा मंडळातर्फे विशेष गौरव करण्यात आला, भारतातून सीडॅकमध्ये 174 रँक मिळविलेल्या किरण महाजन याचाही गौरव करण्यात आला. मंडळाचे सचिव गजेंद्र महाजन यांना नुकत्याच रेल्वेच्या मुख्य वित्त सलाहाकर, मुंबईकडून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही समाज सेवे बरोबर आपल्या कार्यालयीन कामात पण विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरव करण्यात आला. डॉ.भारत माळी यांचा मुक्या प्राण्यांची निःशुल्क ,निस्वार्थी सेवा आणि गोरक्षण साठी भरीव कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावी व बारावीमध्ये समाजातून प्रथम आलेल्यांना बहाळकर यांच्याकडे बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस.एन.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष देवमन रासकर, क्षत्रीय माळी समाजाचे अध्यक्ष नितीन सोनावणे, संदीप महाजन (एरंडोल) होते. सूत्रसंचालन धनंजय महाजन तर आभार प्रदर्शन कैलास बंड यांनी केले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वीतेसाठी सुरेश महाजन, शैलेश माळी, रामकृष्ण माळी, ईश्वर चौधरी, दिलीप माळी, प्रवीण चवरे, दशरथ सोनवणे, चंद्रशेखर वाघमारे, मुकुंदा माळी, विजय वानखेडे, करण कापडे, दीपक भोपळे, संजय महाजन, राजू माळी, महेश बहालकर, पाल्हडे, स्वप्नील पाटील व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !