यावल तालुका पंचायत समिती गणाची आज आरक्षण सोडत
Yawal Taluka Panchayat Samiti Ganache Reservation Today यावल : यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 गणांची गुरुवारी सकाळी 11 वाजता पंचायत समिती कार्यालयात आरक्षण सोडत काढली जाणार आहे. पूर्वी यावल तालुक्यात जिल्हा परीषदेच्या पाच गटातून दहा गण होते मात्र आता एक गट वाढल्यामुळे सहा गटात बारा गण झाले अहेत. या सर्व गणनिहाय आरक्षण निघणार आहे.
आरक्षणाकडे लागले दिग्गज्जांचे लक्ष
यावल तहसील कार्यालयामध्ये पीठासन अधिकारी तहसीलदार महेश पवार यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत निघेल. यात महिला आरक्षणासह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षण काढले जातील. 12 गणातील आरक्षण कसे निघेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उपस्थितीचे, आवाहन तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांनी केले आहे.


