चाळीसगावात धूम स्टाईल विवाहितेच्या गळ्यातून मंगळसूत्र लांबवले : चोरटा जाळ्यात


Mangalsutra extended from neck of married woman in Dhoom style in Chalisgaon: Thief in the net चाळीसगाव : रस्त्याने पायी चालणार्‍या एका विवाहितेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवणार्‍या चोरट्याला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून 70 हजारांची चैन जप्त करण्यात आली.

शहर पोलिसात दाखल होता गुन्हा
शहरातील हनुमानवाडी येथील सुषमा प्रमोद पाटील (35) ही विवाहिता 18 जून 2022 रोजी रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील भामट्याने त्यांच्या गळ्यातील 70 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लांबवली होती. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलिसांनी गोपनीय माहितीवरून संशयीत शेख सलिमोद्दीन शेख अफलजोद्दीन (52, कासंबरी दर्गा, पडेगाव, जि.औरंगाबाद याला अटक केली आहे. आरोपीने सुषमा पाटील या विवाहितेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवण्याची कबुली देत मुद्देमाल काढून दिला आहे.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक भरत काकडे, चाळीसगाव शहरचे निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, राहुल सोनवणे, निलेश पाटील, विजय पाटील, विनोद भोई, रवींद्र च्छे आदींनी केली. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास आव्हाड व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !